नंदुरबार महाराष्ट्र

रजेचा अर्ज मंजूर करण्यासाठी मुख्याध्यापकाने घेतली लाच

नंदुरबार (प्रतिनिधी): शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील एका मुख्याध्यापकाला रजेचे अर्ज मंजूर करून देण्यासाठी ₹२,३५० ची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या प्रलंबित रजेचे अर्ज मंजूर करण्यासाठी संबंधित मुख्याध्यापकांनी ₹२,३५० रुपयांची मागणी केली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर मागणी निष्पन्न झाल्याने सापळा रचण्यात आला.
रविवारी (दि. २७ जुलै) आरोपीने तक्रारदाराकडून ₹२,३५० ची लाच स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ ताब्यात घेतले. याप्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक रेश्मा चंद्रकांत अवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली असून पुढील तपास सुरू आहे.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *