नंदुरबार नाशिक

आरोग्य सेविका लीना हिरणवाळे व टीमचा आ. दिलीप बोरसे यांच्या हस्ते विशेष सन्मान

आरोग्य सेविका लीना हिरणवाळे व टीमचा आ. दिलीप बोरसे यांच्या हस्ते विशेष सन्मान

नंदुरबार (प्रतिनिधी) वर्षभरात 207 मातांची यशस्वी प्रसुती केल्याबद्दल अलियाबाद प्राथमिक आरोग्य केंद्राचा बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत सटाणा तालुक्यातील अलियाबाद प्राथमिक आरोग्य केंद्राला विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.
सन २०२५–२६ या कालावधीत अलियाबाद प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत २०७ यशस्वी प्रसूती करण्यात आल्याबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी अलियाबाद प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या, कर्तव्यदक्ष आरोग्य सेविका लीना हिरणवाळे व त्यांच्या संपूर्ण टीमचा बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
अलियाबाद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा मोहिते, यांच्या मार्गदर्शनाखाली
अमोल देशमुख, संगीता बागुल, संगीता मोरे, वाहन चालक पंडित चौरे तसेच अलियाबाद व वाघम्बा येथील आशा सेविका उपस्थित होत्या. आरोग्य सेविका लीना हिरणवाळे यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. त्या नंदुरबार येथील पत्रकार आणि प्रवासी महासंघाचे अध्यक्ष महादू हिरणवाळे व सौ. सुनिता हिरणवाळे दाम्पत्याच्या सुकन्या आहेत.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *