नंदुरबार

राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त कार्यशाळा

राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त कार्यशाळा

एकलव्य विद्यालयात राष्ट्रीय आकाश दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विज्ञान विभागातर्फे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांमधे वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, संशोधनवृत्ती आणि अवकाश तंत्रज्ञानात भारताचे भवितव्य या गोष्टी ज्ञात होण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळाचे विज्ञान विभाग प्रमुख मिलिंद वडनगरे सर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांनी आदित्य एल1 या सौर वेधशाळेच्या 51 प्रतिकृती तयार केल्यात.

या प्रसंगी शाळेच्या माजी प्राचार्या सुहासिनी नटावदकर यांनी विद्यार्थ्यांच कौतुक केलं व कार्यशाळेला शुभेछा दिल्यात. aadity L1 प्रतिकृतींच डिझाईन अथर्व वडनगरे याने केलं तर धर्मराज करंकाळ, गिरीश चौधरी यांनी सहकार्य केले.

कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य धर्मेंद्र मराठे होते. उपप्राचार्य डॉ गिरीश पवार, पर्यवेक्षक टीका पाडवी, जेष्ठ शिक्षक वसंत वसईकर, प्रा.प्रकाश चौधरी, शाळा विज्ञान विभाग प्रमुख राहूल भावसार आदी उपस्थित होते.
या प्रसंगी साची बैरागी हिने चांद्रयान 3 मोहिमेची माहिती दिली. श्रेया कुलकर्णी हिने विक्रम लँडर व प्रज्ञान रोहरचे कार्य स्पष्ट केले. जिशान पिंजारीने आदित्य एल1 चे कार्य समजवले तर दक्षिण अघावने इस्त्रोचे विविध क्षेत्रातील यश स्पष्ट केले. प्रा.प्रकाश चौधरी यांनी विद्यार्थ्यांना अवकाश संशोधन, अंतराळ तंत्रज्ञान, विविध अंतराळ मोहिमा तसेच भविष्यातील वैज्ञानिक आणि संशोधनाच्या संधी याविषयी अत्यंत माहितीपूर्ण व प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी प्राचार्य धर्मेंद्र मराठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी भविष्यात अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करावी आणि देशाच्या वैज्ञानिक प्रगतीत योगदान देणारे संशोधक घडावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सूत्र संचालन सोनाक्षी सोमवंशी व मंजिरी ठाकूर हिने केले. आदित्य
L1 च्या प्रतिकृती विद्यार्थ्यांना घरी देण्यात आल्या.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *